Pagot Gram Panchayat Election 2022 : शिवसमर्थ परिवर्तन आघाडीचा डोअर टू डोअर प्रचार

pagote-prachar
उरण (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतची निवडणूक 18 डिसेंबर 2022 रोजी आहे. गावच्या सर्वागीण विकासासाठी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत शिव समर्थ परिवर्तन आघाडी स्थापन करून गावच्या विकासासाठी शिव समर्थ परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे. पागोटे गावात प्रत्येक वार्डात शिवसमर्थ परिवर्तन आघाडीचा जोरात प्रचार सुरु आहे. हुतात्म्यांना अभिवादन करून सुरु झालेल्या शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या प्रचाराला जनतेचा मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
पागोटे ग्रामपंचायत निवडणूक 2022 च्या सरपंच पदासाठी शिव समर्थ परिवर्तन आघाडीचे कुणाल अरुण पाटील (निशाणी कपबशी), वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार सुजित हसुराम तांडेल (निशाणी बॅट ), समृद्धी तुळशीराम तांडेल(निशाणी कपाट ), सतीश ज्ञानेश्वर पाटील (निशाणी ऑटोरिक्षा), तर वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार करिश्मा गणेश पाटील (निशाणी टेबल ), प्राजक्ता हेमंत पाटील (निशाणी बॅट), अधिराज किशोर पाटील (निशाणी कपाट), आणि वार्ड क्रमांक 3 चे उमेदवार सोनाली दिनेश भोईर (निशाणी कपाट ), सुनिता विश्वनाथ पाटील (निशाणी- छताचा पंखा ), मयूर भालचंद्र पाटील (निशाणी बॅट) हे उमेदवार शिव समर्थ परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत.
दिनांक 10/12/2022 पासून शिवसमर्थ परिवर्तन आघाडी प्रचाराला लागली आहे. सतत दररोज मोठ्या उत्साहात प्रचार सुरु आहे. जनतेच्या गाठी भेटी सुरु असून शिवसमर्थ परिवर्तन आघाडीचे प्रत्येक उमेदवार प्रत्येक घरा घरात जाऊन लहान मोठ्यांचे, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत प्रचार करत आहेत. यावेळी जनतेचाही शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद, चांगला प्रतिसाद असल्याचे पाहावयास मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *