पनवेल (संजय कदम) : शहरातील तक्का येथून एक विवाहिता आपल्या १ वर्षाची चिमुकलीसह कोठेतरी निघुन गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रूजगारीबाई पप्पी गारदी (वय २१) असे या महिलेचे नाव आहे. तिची उंची ४ फुट ५ इंच, रंग गोरा, अंगाने सडपातळ, चेहरा, उभट नाक, केस छोटे पसरट व काळे असून अंगात हिरव्या रंगाचा टॉप, हिरव्या कलरची पॅन्ट, पायात काळया रंगाची चप्पल, सोबत छोटी पर्स असा पेहराव आहे.
तसेच तिच्यासोबत तिची एका वर्षाची चिमुकली कुवरजादी सोबत असून दोघेही कोठेतरी निघुन गेल्याने ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.०२२२७४५२३३३ किंवा पोलीस नाईक अतुल देवकर यांच्याशी संपर्क साधावा.