PANVEL : विश्राळी तलावात आढळला मृतदेह

dead-body-1
पनवेल (संजय कदम) : शहरातील गुजराती शाळेजवळील विश्राळी तलावात एक अनोळखी इसम पाण्यात बुडलेल्या अवस्थेत मिळुन आल्याची घटना घडली आहे. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे असून अंगाने सडपातळ, रंग सावळा, उंची अंदाजे ५ फुट ५ इंच, डोक्याचे केस काळे, दाडी मिशा वाढलेली काळी, नाक जाडसर तसेच अंगात काळया रंगाची अंडरविअर, त्यावर Lux असे लाल अक्षरात लिहीलेले आहे. त्याचप्रमाणे मयत इसमाच्या उजव्या खांदयावर त्रिशुल व ओम गोंदलेले असून उजव्या डोळयाच्या वर जखम आहे.
सदर इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र २७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांच्याशी संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *