PEN टाइम्स | आजचे राशीभविष्य | ०९ फेब्रुवारी २०२१ | मंगळवार

rashibhavishya
1

मेष

गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील. झोपेची तक्रार दूर करावी. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. हातातील कामात यश येईल. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.

    2

वृषभ

श्रमामुळे थकवा जाणवेल. मैत्रीचे संबंध जपावेत. पैशाचे गणित तपासून पहावे लागेल. कामात चंचलता आड आणू नका. नवीन लोकांच्यात मिसळावे.

 

3

मिथुन

मानसिक चंचलता जाणवेल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल. काही कामे तुमचा कस पाहतील.

4

कर्क

शांत व संयमी विचारांची जोड घ्यावी. उतावीळपणा करून चालणार नाही. आपले कष्ट सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देवू नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

        5

सिंह

आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. मत्सराला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य गणित मांडावे. गरज पाहून खर्च करावा.

6

कन्या

कामाला योग्य दिशा मिळेल. उत्कृष्ट साहित्य वाचनात येईल. घरातील कामात अधिक लक्ष घालावे लागेल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. कामे वेळेत पूर्ण करता येतील.

7

तूळ

जोडीदाराच्या मताचा आदर कराल. काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. घरातील समस्या जाणून घ्याव्यात. अचानक धनलाभ संभवतो. स्थावरची कामे मार्गी लागतील.

8

वृश्चिक

व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. मनातील संकोच दूर सारावा. जवळच्या व्यक्तीजवळ मोकळे करावे. कामातून समाधान शोधाल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

9

धनु

वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे. चिकाटी सोडून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जुनी कामे नव्याने सामोरी येतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

10

मकर

औद्योगिक वातावरण चांगले राहील. काही गोष्टी अनपेक्षितपणे लाभतील. आवडते खाद्यपदार्थ चाखायला मिळतील. तुमची समाजप्रियता वाढेल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल.

11

कुंभ

प्रवासात काहीसा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. काही कामात अडकून पडल्यासारखे वाटू शकते. मनातील इच्छेला पूर्णत्व येऊ शकते. जिथे जाल तिथे आनंद वाटाल.

12

मीन

कामाची लगबग राहील. काही अनपेक्षित बदल जाणवतील. लहान मुलांच्यात रमून जाल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. हातातील कामात यश येईल.

 

National Computer Adv