PEN टाइम्स | आजचे राशीभविष्य | १९ फेब्रुवारी २०२१ | शुक्रवार

rashibhavishya
1

मेष

आवडत्या लोकांच्यात रमून जाल. बोलण्यात मधाळपणा जपाल. कामाच्या ठिकाणी संबंध जपाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल.

    2

वृषभ

मैत्रीत कटुता येणार नाही याची काळजी घ्यावी. उगाच चिडचिड करू नका. आपली संगत एकवार तपासून पहावी. जवळचा प्रवास मजेत कराल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल.

 

3

मिथुन

मनातून निराशा दूर सारावी. अडथळ्यातून मार्ग काढावा. खर्चाचे योग्य नियोजन करावे. मुलांचा आनंद द्विगुणित होईल. उधारीचे व्यवहार सावधानतेने करावेत.

4

कर्क

खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. फार अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमचे धाडस वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

        5

सिंह

जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. भागीदारीत खुश राहाल. संपर्कातील लोकांचा जिव्हाळा वाढेल. इतरांच्या मताचा आदर करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.

6

कन्या

वैवाहिक सौख्यात वाढ होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. शेअर्स मधून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल. कौटुंबिक बाबीत दुर्लक्ष करू नका.

7

तूळ

काही कामे कमी श्रमात पार पडतील. अचानक धनलाभ संभवतो. रेस, सोडत यातून लाभ संभवतो. बौद्धिक ताण राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.

8

वृश्चिक

कामात स्थिरता ठेवावी. धार्मिक वृत्तीत वाढ संभवते. इतरांना आनंदाने मदत कराल. पित्तविकार बळावू शकतात. इतरांच्या विश्वासास पात्र व्हाल.

9

धनु

कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. गोड बोलून कामे साध्य करता येतील. कलागुण उत्तमरीत्या प्रकट होतील. घराची सजावट कराल. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहील.

10

मकर

मानसिक चंचलता जाणवेल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. वागण्यात शालीनता दाखवाल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

11

कुंभ

दिवस मनाजोगा घालवाल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल. तुमची उत्तम छाप पडेल. जि‍भेवर साखर ठेवून बोलाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

12

मीन

कलासक्त दृष्टीकोन वाढीस लागेल. मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. आवडीचे पदार्थ खाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आनंदी दृष्टीकोन बाळगाल.

 

National Computer Adv