पेण ( राजेश प्रधान ) : प्रहार अपंग क्रांती संघटना पेण तालूका यांच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त शनिवारी दिनांक ३ डिसेंबर रोजी दिव्यांग तपासणी व ऑनलाइन सर्टिफिकेट वितरण शिबिराचे आयोजन पेण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. याप्रसंगी दिव्यांगांकरिता अभा म्हणजे नॅशनल हेल्थ ॲथॉरिटी तर्फे आरोग्य विम्याची नोंदणी करून त्वरित सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.
केसपेपर काढण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत आहे. डॉक्टर चेकप व सर्टिफिकेट वितरण वेळ सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ वाजे पर्यंत आहे. तरी दिव्यागांनी येताना लागणारे ओरीजनल पेपर व झेरॉक्स सोबत घेऊन येणे, आधार कार्ड, रेशनकार्ड, ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रत, मतदान कार्ड किंवा अलिबाग सिव्हिल रुग्णालय किंवा अलिबाग बाहेरील वैद्यकीय तपासणी दाखला सोबत घेऊन येणे असे आवाहन प्रहार अपंग क्रांती संघटने तर्फे करण्यात आले आहे.
या प्रसंगी सिव्हील हॉस्पिटल अलिबाग तर्फे लाभार्थीना वस्तूंचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच तहसील कार्यालया मार्फत दिव्यांग मतदार म्हणून १९१ पेण विधानसभा मतदार नोंदणी व दुरुस्ती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तरी सर्व दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा.
ज्या दिव्यांगांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झालेले नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे. अधिक मार्गदर्शनाकरिता भालचंद्र भगत 9970820197 प्रकाश नाईक 8805315956 राहुल म्हात्रे 8087810026 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.