पेण (राजेश प्रधान) : दादर ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन होऊन श्री काळभैरव विकास आघाडीची सत्ता आली असून मतदारांनी भरघोस मतदान करून जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरला. महिलावर्गासह तरुण व जुनेजाणते कार्यकर्ते यांनी जे सकार्य केले त्याची जाण ठेऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार.” असा दृढविश्वास यशवंतदादा घासे यांनी दादर ग्रामपंचायत निवडणूक विजयानंतर मनोगत व्यक्त करताना केला.
पेण तालुक्यातील दादर ग्रामपंचायत निवडणुकीत काळ भैरव विकास आघाडीच्या माध्यमातून यशवंतदादा घासे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. श्री काळभैरव विकास आघाडी कडून थेट सरपंच पदासाठी तेजस्वी चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला.
वार्ड क्र. १ मधून मंगल गजानन पाटील व आशा रमेश पाटील, वार्ड क्र. २ मधून राहुल गजानन पेरवी व योगिता राजन पाटील, वार्ड क्र. ३ मधून मंगेश जनार्दन पाटील,मच्छिंद्र गणेश ठाकुर व शैला ज्ञानेश्वर नाईक, वार्ड क्र. ५ मधून वैभव गणेश पाटील, प्रतिभा देवेंद्र पाटील व सिद्धीका संदीप गावंड हे उमेदवार निवडून आले.
राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंतदादा घासे यांच्यासह शेकापक्षाच्या नेत्या स्मिता प्रमोद पाटील, सदानंद म्हात्रे, संतोष म्हात्रे, एम. के. सर, भास्कर पाटील, धनाजी पाटील, जयराम डंगर, अंबु पेरवी, नारायण पाटील, प्रल्हाद पाटील, संजीव पाटील, दीपक पाटील, सिकंदर पाटील, गंगाधर भोईर, सदानंद जोशी, गजानन घासे, प्रभाकर ठाकुर, चंद्रकांत ठाकुर, तुकाराम पाटील, श्यामजी पाटील, जनार्दन ठाकुर, जनार्दन वागळे, ज्ञानेश्वर नाईक यांच्यासह महिलावर्ग तरुण व जुनेजानते हजारो कार्यकर्ते यांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे सरपंच तेजस्वी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी पिंट्याशेठ पाटील व दिनेशशेठ पाटील यांना अभिवादन करण्यात आले.