पेण (राजेश प्रधान) : भाजपाचे प्रभारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण याच्या आदेशाने राज्याचे प्रभारी संजय केणेकर, तसेच भाजप महाराष्ट्र कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांच्या मार्गदर्शनानुसार व सरचिटणीस प्रमोद जाधव विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर, कमलेश राणे यांच्या सहकार्यांने भाजपा कामगार आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य व कामगार प्रकोष्ट (सेल) च्या कोकण सरचिटणीसपदी वासुदेव पोसुराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
पेण मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपा कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष विनोद शहा, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, प्रमोद जाधव हे उपस्थित होते.
वासुदेव पाटील हे गेली कित्येक वर्ष राजकारणात सक्रिय असून जनकल्याण ग्रामीण पतसंस्थेचे २५ वर्षे अध्यक्ष आहेत. तसेच सहकार क्षेत्राचा वारसा त्यांना त्यांचे वडील पोसुराम पाटील यांच्या पासून मिळाला असून सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष, व सहकारी क्षेत्रातील अनेक संघटना, संस्था यामध्ये ते कार्यरत आहेत.
कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस म्हणून ते कार्यरत असून आता त्यांची निवड भाजपा कामगार आघाडी कामगार प्रकोष्ट कोकण सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले.