मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोल 94 रूपयांच्या पुढे गेले असतानाच सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा लागोपाठ चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, पेट्रोलच्या किंमतीत 29 पैसे प्रति लीटरपर्यंत आणि डिझेलच्या किंमतीत 38 पैसे प्रति लीटरपर्यंत वाढ झाली आहे.
दिल्लीत पेट्रोलची किंमत 88.14 रुपये प्रति लीटर आणि मुंबईत 94.64 रुपये प्रति लीटर झाली आहे. मुंबईत डिझेल 85.32 रूपये प्रति लीटर झाले आहे. चार दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत जवळपास 1.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली आहे.