पुणे : स्वप्नसिद्धी गणपती मंदिर, मळवली-पाटण, लोणावळा येथील तळमजल्यावर स्थापन झालेल्या श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि श्री पादुका पूजन सोहळा दिनांक 22 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे निमंत्रण अॅड. सीमा शर्मा-जाधव, श्रीमती दगडाबाई रामगुडे चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री स्वामी समर्थ सेवा परिवार मळवली-पाटण यांनी केले आहे.
अॅड. सीमा शर्मा-जाधव यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा पेण टाइम्सला सांगताना म्हटले की, दिनांक 22 मार्च 2025 रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 1.30 या कालावधीत प्राणप्रतिष्ठा आणि पादुका पूजन विधी आणि मध्यान्ह आरती होणार आहे. तर दुपारी 1.30 ते भाविकांच्या अगामनापर्यंत महाप्रसाद असणार आहे.
तसेच दिनांक 23 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सकाळी 7.30 वाजता होणार असून या निमित्त आरती, श्री स्वामी समर्थ व्याधी निवारण पाठ पठन प्रारंभ होणार आहे.
तर दिनांक 31 मार्च 2025 रोजी सकाळी 9.30 ते 12.30 पर्यंत पाठ पठन उद्यापन आणि श्री स्वामी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे, असे आग्रहाचे निमंत्रण अॅड. सीमा शर्मा-जाधव यांनी केले आहे.
”कौटुंबिक वाद आणि समस्या यांचे निवारण आणि मार्गदर्शन”
”श्री स्वामी महाराज यांच्या इच्छेने आणि सामर्थ्याने मळवली पाटण येथे नवीन स्वामी समर्थ मठ स्थापन झाला आहे. या मठाच्या माध्यमातून एक वकील म्हणून अनेक कौटुंबिक वाद आणि समस्या यांचे निवारण आणि मार्गदर्शन माझ्या आऊट ऑफ कोर्ट फाउंडेशन मधून केले जाणार आहे, स्वामी सेवा हा त्यातील एक मन:शांतीचा आध्यात्मिक मार्ग असणार आहे”. – अॅड. सीमा शर्मा-जाधव