Raigad Corona Update : जिल्ह्यात 646 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद

अलिबाग : काल जिल्ह्यात कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-215, पनवेल ग्रामीण-68, उरण-14, खालापूर-28, कर्जत-31, पेण-44, अलिबाग-81, मुरुड-13, माणगाव-53, तळा-4, रोहा-47, सुधागाड-12, श्रीवर्धन-2, म्हसळा-4, महाड-18, पोलादपूर-12 असे एकूण 646 ने वाढ झाली आहे.

कालच्या दिवसात 15 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-5, खालापूर-1, कर्जत-1, पेण-1, अलिबाग-4, तळा-1, महाड-1, पोलादपूर-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-2 हजार 144, पनवेल ग्रामीण-876, उरण-218, खालापूर-335, कर्जत-221, पेण-549, अलिबाग-818, मुरुड-72, माणगाव-364, तळा-43, रोहा-497, सुधागड-64, श्रीवर्धन-63, म्हसळा-37, महाड-222, पोलादपूर-41 अशी एकूण 6 हजार 564 झाली आहे.

कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-12 हजार 839, पनवेल ग्रामीण-3 हजार 930, उरण-1 हजार 369, खालापूर-1 हजार 771, कर्जत- 1 हजार 019, पेण-2 हजार 397, अलिबाग-2 हजार 663, मुरुड-225, माणगाव- 1 हजार 057, तळा-71, रोहा-1 हजार 386, सुधागड-260, श्रीवर्धन-245, म्हसळा-226, महाड- 1 हजार 114, पोलादपूर-246 अशी एकूण 30 हजार 818 आहे.

काल दिवसभरातही पनवेल मनपा-159, पनवेल ग्रामीण-76, उरण-45, खालापूर-18, कर्जत-40, पेण-62, अलिबाग-103, माणगाव-45, तळा-28, रोहा-37, सुधागड-8, श्रीवर्धन-1, म्हसळा-2, महाड-18, पोलादपूर-17 असे एकूण 659 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

आतापर्यंत पनवेल मनपा-352, पनवेल ग्रामीण-86, उरण-79, खालापूर-90, कर्जत-57, पेण-80, अलिबाग-83, मुरुड-21, माणगाव-23, तळा-7, रोहा-50, सुधागाड-16, श्रीवर्धन-17, म्हसळा-10, महाड-52, पोलादपूर-14 असे एकूण 1 हजार 037 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 32 हजार 812 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 297 आहे.