पुण्यात ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहिमेची विविध माध्यमांतून व्यापक यशस्वी सांगता

पुणे : राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत. त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही चळवळ राबवली जाते. या चळवळीच्या अंतर्गत पुणे, पिंपरी, चिंचवड, भोर, जुन्नर, तळेगाव, सासवड, एरंडवणे येथील 55 हुन अधिक शाळांमध्ये निवेदन दिले. तसेच ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयी व्याख्याने घेण्यात आली.

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शाळा, महा विद्यालयामध्ये प्रतिज्ञा घेण्यात आली. मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी विविध शाळांमध्ये क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग आदी ठिकाणीही ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ याविषयी निवेदने देण्यात आली.

यासमवेत हस्तपत्रके वितरित करणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे,फलक लिखाण, सामाजिक माध्यमाद्वारे जनप्रबोधन करण्यात आले. पुणे जिल्ह्यात ही चळवळ यशस्वी होण्यासाठी समाजातील राष्ट्रप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सहभाग लाभला. या चळवळीला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मोहिमेअंतर्गत भोरचे निवासी नायब तहसीलदार आदिनाथ गाजरे यांना निवेदनही दिले. यावेळी भोर मनसे शहर अध्यक्ष शशिकांत वाघ, धर्मप्रेमी शरद भिलारे, हिंदु जनजागृती समितीचे विश्वजीत चव्हाण उपस्थित होते. शाळा कॉलेज मधील सर्व विदयार्थ्यांनी विषय शांतपणे ऐकून घेतला आणि भारतमातेचा जय घोष केला.
तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानेही राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान होवू नये या विषयी सकारात्मकता दाखविली होती. राष्ट्रध्वजाचा मान राखा!’ या मोहिमेने समाजातील सर्व स्तरांवर राष्ट्रप्रेम जागृत करून भारतीय राष्ट्रीय अस्मितेला नवा आयाम दिला आहे. हिंदु जनजागृती समितीच्या अथक प्रयत्नांमुळे, भविष्यातही या मोहिमेतून प्रेरणा घेऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जाईल असे मत बहुतेकांनी वक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *