कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील किल्ला येथे खासदार सुनिल तटकरे पालकमंत्री ना अदिती तटकरे आ अनिकेत तटकरे यांच्या आदेशानुसार तसेच धाटाव रोहा इंडस्ट्रियल यांच्या सहकार्याने रोहा प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा यांच्या नियमानुसार दिनांक 19 जुलै 2020 रोजी कोविड सेंटर उघडण्यात आले.
सदर या कोविड सेंटर मध्ये सुमारे 72 रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था उपलब्ध असून दोन डॉक्टर आणि सहा परिचारिका आदि रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत असून रुग्ण व्यवस्थित ठणठणीत बरा झाला की त्यांना सुरक्षित घरी सोडण्यासाठी 3 अँम्बुलन्सची देखील व्यवस्था केलेली आहे. या कोविड सेंटरमध्ये दररोज तपासणी केलेले पॉझिटिव्ह असलेले दहा ते पंधरा रुग्ण येत असतात. आज तगायत एकूण 395 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले होते त्यांपैकी 332 जणांना डिस्चार्ज घरी पाठवले असल्याचे येथील सुत्रांनी सांगितले. डॉक्टर संजीव दुबे आणि डॉक्टर सारा यांच्या देखरेखीखाली येथील रुग्णांची दिवसातून दोनदा तपासणी होत असून तपासणी करताना जिव्हाळ्याने रुग्णांची चौकशी संजीव दुबे करत आहेत. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्यांचा बरे होण्याचा आत्मविश्वास अधिक वाढत असून आपले अगत्याने चौकशी करणाऱ्या डिस्चार्ज घेताना अनेक जण डॉक्टर संजीव दुबे यांना धन्यवाद देत आहेत.
या सेंटर मधील मधील भोजन व्यवस्था आणि रुग्णांना मदत करणारे जनार्दन ढेबे ही व्यक्ती ॲक्टिव आहे. रुग्णांना आणताना आणि बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडताना तेवढ्याच प्रवासात घरी गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची, काय खायचे, कोणते पथ्य पाळायचे हे सारे सांगत असतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे रुग्णालयात भोजन व नाश्ता ची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे. जेवण अत्यंत व्यवस्थित असते त्याचप्रमाणे येणारा नाश्ता सुद्धा उत्तम असल्याने तेथे सात दिवस राहणारा नाश्ता आणि जेवणा विषयी डिस्चार्ज घेताना प्रशंसा करत आहे. या कोविड सेंटरमध्ये स्वच्छता सुद्धा उत्तम प्रकारे असून स्वच्छता करणारे वेळोवेळी दक्षता घेत असल्यामुळे परिसरात, खोलीत टापटीप पणा असतो. या कोविड सेंटरमध्ये रोहा तालुक्यातील विविध ग्रामीण भागांतून पॉझिटीव्ह झालेले रुग्ण दाखल होत असतात.
सुरुवातीला रुग्णांच्या मनात भीती असते या ठिकाणी आपल्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था कशी होईल. मात्र दाखल झाल्यानंतर एका दिवसातच रुग्णाला चांगला अनुभव येतो. त्यामुळे इतरांच्या मनातील भीती दूर होते. उत्तम सेवा, उत्तम जेवण, नाश्ता, आपुलकी, डॉक्टरांची उत्तम सेवा यामुळे रुग्णांना नवी संजीवनी देणारे असेच असून कोरोनाची भीती नष्ट करणारे असेच असल्यामुळे अनेक जण धन्यवाद देऊन कोविड सेंटरमधून आनंदात आपल्या घरी जात आहेत. डॉ. सजीव दुबे, डॉ. सारा तसेच नर्स शारदा करडे, संचीता पाटील, मयुरी जुईकर, चेतना पाटील, वाहन चालक शरद कदम, शिव, वार्ड बॉय-दत्ताराम ढेबे, जमीर, उमेश, भारती मावशी, मनिशा मावशी, बाबु गुरव हे कोविड सेंटर किल्ला येथे विशेष सहकार्य करत आहेत.