नवी दिल्ली : इलेक्ट्रोनिक क्षेत्रातील आघाडीचा ब्रांड असलेल्या सॅमसंग कंपनीने आता आपल्या उत्पादनाचा पुढील टप्पा भारतात सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जर कंपनीने या निर्णयाची अंमलबजावणी करून भारतात गुंतवणूक केली तर भारतात हजारोंना रोजगार मिळेल.
सध्या ही कंपनी दक्षिण कोरिया या त्यांच्या मातृदेशासह व्हियेतनाम आणि इतर आशियाई देशात आपली उत्पादने बनवते. पुढील विस्तारासाठी आता ही कोरियाई कंपनी सज्ज झालेली असून त्यांनी त्यासाठी भारताला प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या चळवळीला यामुळे मोठे बळ मिळेल.
इकॉनॉमिक टाईम्स या अर्थपत्राने ही महत्वाची बातमी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, जर कंपनीने हा निर्णय घेतला तर ती भारतात किमान 40 अरब डॉलर इतकी मोठी गुंतवणूक करू शकते.