शंखनाद महोत्सव : युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य करणारे यांच्या रक्षणार्थ ‘शतचंडी याग’ पार पडला !

सनातन संस्थेच्या आश्रमात श्री ललिता त्रिशती पूजन
फोंडा, (गोवा) – भारताच्या विजयासाठी, तसेच सैनिकांसह देश-विदेशातील साधक आणि समस्त धर्मप्रेमी यांच्या रक्षणासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ३५ पुरोहितांद्वारे शतचंडी याग पार पडला. शतचंडी याग चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्याविषयी आणि सनातन संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढत रहावे, यांसाठी २२ मे या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘श्री ललिता त्रिशती देवी’ची पूजा भावपूर्ण वातावरणात करण्यात आली. या पूजेत तमिळनाडू येथील श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य, श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती यांनी त्रिपुरासुंदरी त्रिशती देवीची नावे उच्चारत पुष्पार्चना केली.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ, तसेच श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पूजेचे यजमानपद भूषवले. या वेळी सनातनचे उपस्थित संत आणि साधक यांनी पूजेच्या संकल्पपूर्तीसाठी श्री ललितादेवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.
शतचंडी यागात आद्यहोम, सप्तशती पारायण, कन्यापूजन, सुवासिनी पूजन, ब्रह्मचारी पूजन, दांपत्य पूजन, गोपूजन या धार्मिक विधीनंतर पूर्णाहुती आदी धार्मिक विधी झाले. १०० पाठांचा जप आणि १० पाठांचे हवन करण्यात आले. श्री ललिता त्रिशती देवीची पूजा ललितादेवीची कृपा आणि आशीर्वाद मिळण्यासाठी केली जाते. या पुजेतून सैनिक, साधक आणि धर्मप्रेमी यांच्या शरीरासह, मन, बुद्धी आणि सूक्ष्म देह यांभोवती संरक्षण कवच निर्माण व्हावे, यासाठी आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

news edited by ajay sonawane, editor / journalist

***

Shankhnaad Mahotsav: Shatchandi Yag was celebrated for the protection of the soldiers and religious workers who helped India achieve victory in the war!
Sanatan Sanstha’s Ashramat Shri Lalita Trishati Pujan

Fonda, (Goa) – For the victory of India, as well as for the protection of the soldiers as well as the devotees in the country and abroad and all the lovers of religion, Shatchandi Yag was crossed by 35 priests on the grounds of Goa Engineering College on the occasion of ‘Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav’. Shatchandi Yag was successfully completed and the work of Sanatan Sanstha continued to grow, hence on the 22nd day the puja of ‘Shri Lalita Trishati Devi’ was performed in an emotional atmosphere at the Ashram of Sanatan Sanstha in Ramnathi, Goa. Or Sri from Pujeta Tamil Nadu. Gurumurthy Shivacharya, Shri. Arun Kumar Gurumurthy said Tripurasundari Trishati Devichi Nave pronounced Pushparchana Keli.

The spiritual successors of Sachchidananda Parabrahma Dr. Jayant Balaji Athawale, Shri Satshakti (Sr.) Binda Nilesh Singbal and Sadguru Nilesh Singbal, as well as Shri Chitshakti (Sr.) Anjali Mukul Gadgil and Sadhguru Dr. Mukul Gadgil worshiped Yajmanapada Bhushawale. Or at that time, the saints and devotees present at Sanatana prayed at the feet of Shri Lalita Devi for the fulfillment of their worshipped resolve.

Religious rituals like Shatchandi Yagat Aadyahom, Saptashati Parayan, Kanya Puja, Suvasini Puja, Brahmachari Puja, Matrimonial Puja, Cow Puja or Purnahuti after religious rituals etc. are performed. 100 Pathanchas were chanted and 10 Pathanha Havan was performed. Shri Lalita goes to Trishati Devichi Pooja to seek blessings and blessings of Lalita Devichi. Or a prayer was made at the feet of Adishakti to create a protective shield around the body, mind, intellect and subtle body of the revered soldier, seeker and religious lover.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *