सहभागी मावळ्यांच्या वंशजांनी घेतली अनेक संतांची आणि हिंदुत्वनिष्ठांची भेट!
फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी ) : फोंडा येथे १७ ते १९ मे दरम्यान पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मावळे सरसेनापती येसाजी कंक याचे १३ वे वंशज रविंद्र कंक, दत्तात्रय कंक, हिंदवी स्वराज्याचे स्थापत्यशास्त्रज्ञ हिरोजी इंदलकर यांचे वशंज श्रीनिवास इंदलकर, कान्होजी जेधे यांचे वंशज युवराज जेधे हे सहभागी झाले होते.
मावळ्यांचे वंशज रवींद्र कंक यांनी अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढी मंदिराचे महंत श्री राजूदासजी महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला तसेच भाग्यनगर येथील हिंदुत्वनिष्ठ विधायक श्री. राजा सिंग ठाकूर यांच्याही भेट घेतली.
रविंद्र कंक म्हणाले देशातून व परदेशातून २५ सहस्रहुन अधिक साधक आणि धर्मप्रेमी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमातून संत, महंत यांचा सहवास आणि अनमोल मार्गदर्शनाचा लाभ होत आहे.हिंदू धर्मासाठी कार्य करणाऱ्या विविध संघटना याठिकाणी भारत हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी एका विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळे आता हिंदू राष्ट्र होणारच आहे अशी माझी खात्री आहे.
शिवकालीन ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनात सरदार येसाजी कंक यांची तलवार आणि सरदार कान्होजी जेधे यांचे चिलखत प्रमुख आकर्षण ठरले.
प्रदर्शनात शिवकालीन युद्धकलेत वापरण्यात येणारी दुर्मिळ शस्त्रे, विविध प्रकारच्या तलवारी, बंदुका, ढाली, जांबिया, तोफा, कट्यारी, चिलखत, शिरस्त्राण, भाले, कुर्हाडी, त्रिशूल, अंकुश, सिकल, पुरबा इत्यादींचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
यामध्ये मावळ्यांच्या वंशजांनी आणलेली सरदार येसाजी कंक यांची तलवार आणि सरदार कान्होजी जेधे यांचे चिलखत हे प्रमुख आकर्षण ठरले.याशिवाय छत्रपतींच्या सैन्यातील सरदारांची सचित्र पराक्रमाची माहितीही उपस्थितांना इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी ठरली.
(news edited by ajay sonawane, editor)
***
‘Sanatan Shankhnad Mahotsav’ participants of Chhatrapati Shivaji Maharaj’s mighty Mavlyan’s descendants!
The descendants of the participating Mavlas took the gift of many children and devotees of Hinduism.
Fonda, Goa (Sachchidanand Parabrahma Dr. Athavalenagari): ‘Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav’ was held here in Fonda between 17th and 19th. Ravindra Kank, Dattatray Kank, 13th descendant of Chhatrapati Shivaji Maharaj’s valiant general Sarsenapati Yesaji Kank, descendants of Hindavi Swarajya architect Hiroji Indalkar, Srinivas Indalkar, Kanhoji. Jedhe’s descendant Yuvraj Jedhe would have been a participant.
Ravindra Kank, a descendant of Mavlyan, took the blessings of Mahant Shri Rajudasji Maharaj of Siddhapeeth Hanuman Garhi temple in Ayodhya and the devout Hindu MLA from Bhagyanagar, Shri. Met Raja Singh Thakur only.
Ravindra Kank said that 25 thousand devotees and religious lovers have participated in the program across the country and abroad. Or through the programme, one gets the benefit of companionship and precious guidance of Saint and Mahant. Various organizations working for Hindu religion have come together here inspired by a common thought to make India a Hindu nation. That is why we will have a Hindu nation, this is what I am sure of.
The historical and rare weapons display of Shiva period, the sword of Sardar Yesaji Kank and the inscription of Sardar Kanhoji Jedhe became the main attractions.
Demonstrations of rare weapons used in the battle of Shiva period, various types of swords, guns, shields, jambia, tofa, katyari, chilakhat, headgear, spear, axe, trident, ankush, sickle, purba etc. would have been a wonderful place.
In this, the sword of Sardar Yesaji Kank, descendant of Mavliya, and the writings of Sardar Kanhoji Jedhe became the main attractions. The illustrated information about the bravery of the Sardars in Yashavya Chhatrapati’s army also provided a direct glimpse of history to the attendees.