फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते. साधूसंतांच्या रक्षणासाठी श्रीरामाचा जन्म झाला. मुघलांचे आक्रमण वाढल्यानंतर हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोविंदसिंग यांचा जन्म झाला. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात हिंदूंच्या रक्षणासाठी प्रभु श्रीराम पुन्हा अवतीर्ण झाल्याचा साक्षात्कार होत आहे, असे वक्तव्य ‘चाणक्य फोरम’चे मुख्य संपादक तथा सेवानिवृत्त मेजर गौरव आर्य यांनी केले.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘सनातन राष्ट्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य’ या सत्रात ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ या विषयावर गौरव आर्य यांनी विचार मांडले.
या वेळी व्यासपिठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश प्रधान, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे समन्वयक सुनील घनवट उपस्थित होते.
हिंदू बलशाली होण्याकडे दुर्लक्ष केल्यानेच देशाचे अवमूल्यन – रणजित सावरकर
‘हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण होणे आवश्यक आहे. हिंदू बलशाली व्हायला हवेत. स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या सरकारने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे देशाचे अवमूल्यन झाले. त्या काळात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी हिंदूंच्या संघटनाला प्रारंभ केला.
सनातनच्या गोवा येथील आश्रमात आल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक कार्याची प्रचिती आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले असे एकमात्र व्यक्ती आहेत, जे राष्ट्राला दिशा देण्यासाठी कार्य करत आहेत. हिंदूंना बळशाली करण्यासाठी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत आहेत, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी या वेळी म्हटले.
या वेळी सुनील घनवट म्हणाले, ‘‘हिंदूंना धर्मशिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणवर्ग चालू केले. सद्यस्थितीत देशात समितीच्या वतीने ५०० ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू आहेत. समितीने समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे.’’ सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून जगभर अध्यात्मप्रसार केला आहे.
तसेच नृत्य, गायन, संगीत याद्वारे अध्यात्मिक प्रगती कशी करायची याचे मार्गदर्शन त्यांनी केले.’’ पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश प्रधान म्हणाले की, महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, त्याप्रमाणे हिंदूंच्या आस्थेचा विचार करून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोवा सरकारनेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा.
news edited by ajay sonawane, editor
***
Shankhnaad Mahotsav: Defense of the nation requires weapons! – Major Gaurav Arya, Chanakya Forum
Fonda, Goa (Sachchidanand Parbrahma Dr. Athavalenagari) – The defense of the nation has to be done with weapons. Shri Rama was born for the protection of saints. After the Mughal invasion, Chhatrapati Shivaji Maharaj and Guru Govind Singh were born to protect the Hindus. Chief Editor of ‘Chanakya Forum’ and retired Major Gaurav Arya made this statement that during Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav, Lord Shri Ram has re-incarnated for the protection of Hindus.
Gaurav Arya discussed the topic ‘Sanatan Rashtra and Sachchidananda Parabrahma Dr. Jayant Athawale’s diverse works’ or the session ‘Sanatan Rashtra Chi Suraksha’ or the topic ‘Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav’.
Or at that time, Ranjit Savarkar, working president of Swatantraveer Savarkar National Memorial, Satish Pradhan, founder president of Punjab Gaurakshak Dal, Sadhguru Nandkumar Jadhav, preacher of Sanatan Sanstha, and Sunil Ghanwat, coordinator of Maharashtra and Chhattisgarh state of Hindu Janajagruti Samiti, would have been present.
Hindus devalue the country by ignoring the powerful – Ranjit Savarkar.
‘Politicization of Hindus and militarization of politics is necessary. Hindus are powerful. The government that came to power in the country after independence did not give any targets. Due to this the country got devalued. During that time, Sachchidanand Parabrahma, Dr. Jayant Athawale, the founder of Sanatan Sanstha, started the organization of Hindus.
Prachiti Aali, the spiritual leader of Ashramat Alyavar Mala Sachchidananda Parabrahma Dr. Athawale of Sanatanchaya Goa. Sachchidanand Parabrahma Dr. Athawale is the only person who works to give direction to the nation. Sachchidanand Parabrahma Dr. Athavale, who is working to strengthen the Hindus, said this at the time of Ranjit Savarkar, Executive President of Swatantraveer Savarkar National Memorial.
Or Sunil Ghanwat said, “Hindu Janajagruti Samiti started religious education classes so that Hindus can get religious education. At present, religious education classes are running in 500 places on behalf of the committee in the country. The committee has done the work of giving direction to the society.” Sadguru Nandkumar Jadhav of Sanatan Sanstha said, ”Sachchidananda Parabrahma Dr. Athawale has spread spirituality throughout the world by guiding the devotees.
Also, he provided guidance on how to make spiritual progress through dance, singing and music.” Satish Pradhan, founder president of Punjab Cow Raksha Dal, said that Maharashtra has given the status of Gomatela State Mother, similarly, considering the faith of Hindus, the Goa government has given the status of Gomatela State Mother, for the sake of Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav.