Rahul Gandhi Stock : राहुल गांधी यांच्याकडील ‘या’ कंपनीचे शेयर २० पट वाढले, झाला जबरदस्त फायदा

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. त्यांच्या पोर्टफोलिओत अनेक कंपन्यांचे स्टॉक आहेत. शुक्रवारी त्यांच्या पोर्टफोलियोमधील एक शेयर व्हेरटोज अ‍ॅडव्हर्टायजिंग (Vertoz Advertising) ने जबरदस्त कामगिरी केली. कंपनीच्या स्टॉकमध्ये ५ टक्के वाढ नोंदली गेली आणि त्यामध्ये अपर सर्किट लागले. व्हेरटोज अ‍ॅडव्हर्टायजिंग एक डिजिटल कंपनी आहे.
शुक्रवार, ५ जुलैरोजी तिचे मार्केट कॅप १५३.६३ कोटी रुपये झाले होते. राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे २६० शेयर होते, जे स्टॉक स्प्लिटनंतर २६०० झाले आणि बोनसनंतर ही संख्या ५२०० शेयरवर पोहोचली. यामुळे राहुल गांधी यांना मोठा फायदा झाला आहे.
स्टॉक स्प्लिट आणि बोनसमुळे झाला फायदा
व्हेरटोज अ‍ॅडव्हर्टायजिंगचा स्टॉक गुरुवारी ६८६.५० रुपयावर बंद झाला होता. शुक्रवारी तो १:१० प्रमाणात स्प्लिट झाला. यामुळे त्याची किमत ३६ रुपये झाली. शुक्रवारी यामध्ये ५ टक्के वाढ नोंदली गेली. तो अपर सर्किट लावगण्यासोबत ३६.०५ रुपयावर बंद झाला.
या स्टॉकमध्ये प्री-स्प्लिट, प्री-बोनस आणि प्राईस अ‍ॅडजस्टमेंटमुळे राहुल गांधी यांच्याकडे कंपनीचे ५,२०० शेयर झाले आहेत. स्टॉक स्प्लिटनंतर २६० शेयर २६०० शेयरमध्ये बदलले होते. बोनसनंतर २६०० शेयर ५२०० शेयरमध्ये बदलले गेले. कंपनीने १:१ च्या प्रमाणात बोनस इश्यूची घोषणा केली होती. कंपनीने फायलिंगमध्ये म्हटले की, ते ३० जुलै, २०२४ ला अथवा त्यापूर्वी बोनस शेयर जमा करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *