
माथेरान : माथेरानमध्ये वारंवार झाड कोसळून वाहनांचे नुकसान होण्याच्या घटनांनी वाहनधारकांची चिंता वाढवली आहे. ३० जूनला दस्तुरी नाका येथे झाड कोसळून तीन कारचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता चार्जिंगसाठी लावलेल्या ई-रिक्षांवर जुने झाड कोसळून, तीन रिक्षांचे मोठे नुकसान झाले.
माथेरान शहरात स्थानिक आणि पर्यटकांच्या दिमतीला पर्यावरणपूरक ई रिक्षा चालवल्या जात आहेत. कम्युनिटी सेंटर येथे उभारण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशन येथे चार्जिंगसाठी लावलेल्या तीन ई-रिक्षांवर सततच्या पावसामुळे जुने झाड कोसळले.
या दुर्घटनेत प्रकाश सुतार, कविता बल्लाळ यांच्या रिक्षांचे मोठे नुकसान झाले. तर तिसर्या रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यामुळे या ई-रिक्षातून त्यांची दुरुस्ती होईपर्यंत सेवा देता येणार नाही.
Tree collapse causes major damage to 3 e-rickshaws, incident in Matheran
Matheran: Frequent incidents of tree collapse causing damage to vehicles in Matheran have increased the concerns of vehicle owners. On June 30, a tree collapsed at Dasturi Naka, damaging three cars. After that, an old tree fell on the e-rickshaws placed for charging, causing major damage to three rickshaws.
Eco-friendly e-rickshaws are being operated in Matheran city for the benefit of locals and tourists. An old tree fell on three e-rickshaws placed for charging at the charging station set up at the community center due to incessant rains.
In this accident, the rickshaws of Prakash Sutar and Kavita Ballal were severely damaged. While the third rickshaw suffered minor damage. Therefore, this e-rickshaw will not be able to provide service until it is repaired.