लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. यूपीमधील आग्रा मुघल म्यूझियमचे नाव बदलण्याची तयारी सुरू आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून म्हटले की, आग्रामध्ये बांधण्यात येत असलेले म्यूझियम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल. आपल्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेच्या कोणत्याही प्रतिकाला स्थान नाही. आपल्या सर्वांचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत. आग्रा मंडळाच्या आढाव्याच्या दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला.