आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी

मुंबई : महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून नमतं घेत सरकारने दोन्ही शासन निर्णय रद्द केले. त्यामुळे आज (५ जुलै) मुंबईतील वरळी येथे विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युतीचे संकेत दिले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, राजने भाषणाच्या सुरुवातीला माझा उल्लेख सन्माननीय असा केला. त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशीच करत आहे. राजने त्याच्या भाषणात मराठीचा मुद्दा व हिंदीच्या सक्तीबाबत अप्रतिम मांडणी केली आहे.
त्यामुळे माझ्या भाषणाची आवश्यकता वाटत नाही. वैयक्तिक मला वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाठ अण्णाजीपंतांनी दूर केला आहे. आता तुमच्याकडून अक्षता टाकण्याची अपेक्षा नाही. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी.
उद्धव ठाकरे म्हणाले, मला कल्पना आहे की आज अनेक बुवा, महाराज व्यस्त आहेत. कोणी लिंबू कापतोय, कोणी टाचण्या मारतोय, कोणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत असेल. कोणी रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो. या सगळ्या बोंदूपणाविरोधात माझ्या आजोबांनी (प्रबोधनकार ठाकरे) लढा दिला आहे आणि त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत.
राज ठाकरे म्हणाले, “सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला असला तरी आपण सर्वांनी सावध राहायला हवं. पुढे काही गोष्टी घडतील, होतील, त्याची मला कल्पना नाही. मात्र, मला वाटतं की ही मराठीसाठीची आपली ही एकजूट कायम राहायला हवी. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुन्हा एकदा साकारावं अशी आशा, अपेक्षा व इच्छा मी व्यक्त करतो.”

 


We both come together to live together

Mumbai: Maharashtra government, bowing to the decision of the state government to implement Hindi language power and three language formula, canceled both the government decisions. Therefore, today (5th July) a victorious fair took place in Worli, Mumbai. While addressing the fair, Shiv Sena (Thackeray) party chief Uddhav Thackeray has indicated similarity with Raj Thackeray.

Uddhav Thackeray said, in the beginning of my political speech, I was mentioned as a respectable banana. It is his duty that all of us are aware of. Therefore, my speech begins with honorable Raj Thackeray. In his speeches, Raje made an extraordinary statement regarding the issue of Marathi and the strength of Hindi.

Therefore, there is no need for my speech. Personally, I feel that the gathering of people is more important than our speech. The intertext between us is far away. There is no expectation from you to show integrity. We have gathered together, we have come together for the journey.

Uddhav Thackeray said, I imagine that today many people, Maharaj are busy. Some people cut the limb, some hit the pond, some go to Gavi and burn embers. Someone may be in trouble. That’s what everyone says. My father (enlightener Thackeray) has led the fight against all the Bundupanis and as his heir, we are standing before you.

Raj Thackeray’s only hint of logic
Raj Thackeray said, “As long as the government has asked for a decision on strict Hindi, we all should be careful. I have no idea what things will happen in the future. Only, I feel that we will remain united only for the sake of Marathi. I express my hope, expectation and wish that the dream of Balasaheb Thackeray will come true once again in Maharashtra.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *