कळंबोलीमधील पे अँड पार्क बनले मद्यपींचा अड्डा

pay-&-park
पनवेल  (संजय कदम ) : सिडको आणि महानगरपालिका या दोन्ही आस्थापनामध्ये सिडको वसाहतीतील जनता भरडली जात आहे. कळंबोली सेक्टर २ व सेक्टर ६ मधील उद्याने डंपिंग ग्राउंड बनली आहेत. गेली काही दिवसापासून कचरा उचलला गेल्या नसल्याने नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तेव्हा तो कचरा ताबडतोब उचलण्यात यावा व गले मद्यपीची बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कळंबोली सेक्टर २ मधील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले पे अँड पार्क उद्यान एक वेळ कळंबोली शान वाढवत होते. त्याच्या संरक्षण भिंती गायब आहेत. ते आज लोप पावत आहे. तर साईनगर वसाहती जवळ सिडकोचे उदयान असून हे शहरातील महत्वाचे उद्यान आहे. याला लागूनच नाला गेला असून तो सिडकोकडून एक दोन वर्ष साफ केला गेला नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. तो नाला पनवेल महानगर पालिकेकडून साफ करण्यात आला पण त्यातील घाण उद्यानात टाकण्यात आल्याने त्याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
मात्र सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतर व येथे सुरक्षा रक्षक नसल्याने या उद्यानाचे सौंदर्य लयास गेलेले आहे. आजमितीस ते उद्यान गर्दुल, मद्यपी, जुगारी आणि भिकारीचे ठिकाण बनले आहे. सेक्टर ६ मधील उद्यानाना काही महिन्यांपूर्वी संरक्षक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या होत्या पण ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या जाळ्या तुटुन गेल्या आहेत. त्यामुळे उद्यान लोप पावत चालले आहे. या संपूर्ण उद्यानात गटुळे व मद्यपींचा दररोज अड्डा जमतो त्यामुळे या ठिकाणी मद्याच्या बाटल्या इतस्ततः विखुरलेल्या दिसून येतात. परिणामी हे उद्यान महिला वर्गाला व जेष्ठ नागरिकांना असुरक्षित बनले आहे.