‘चिंगारीने’ अनेक लोकप्रिय अ‍ॅपला मागे टाकत बाजी मारली

नवी दिल्ली : चीनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर सरकारने आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंजची घोषणा केली.  चॅलेंज्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून, यात शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप चिंगारीने बाजी मारली आहे. चिंगारी अ‍ॅपने बेस्ट व्हिडीओ मेकिंग अ‍ॅपचा खिताब मिळवला आहे.

चिंगारीला सोशल मीडिया अ‍ॅप कॅटेगरीमध्ये भरपूर  प्रमाणात मते  मिळाली . माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे आयोजित अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंजता उद्देश अशा देशी अ‍ॅपची ओळख करणे, ज्याचा युजर वापर करत आहेत व त्यात जागतिक स्तरावरील अ‍ॅप बनण्याची क्षमता आहे.

या स्पर्धेत  हजारो अ‍ॅप्सने भाग घेतला होता. परंतु चिंगारीला मित्रों आणि शेअरचॅट अ‍ॅपने चांगली टक्कर दिली. मात्र हे अ‍ॅप शेवटच्या राउंडमध्ये सामना  करू शकले नाही.

चिंगारी अ‍ॅपचे सह-संस्थापक सुमित घोष याविषयी म्हणाले की, जे फीचर आम्ही देतो, ते खासकरून युवा भारतीयांसाठी तयार केलेले आहे. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे भारतीय युजर्सच्या आवडीची नक्कीच काळजी घेऊ.