रोहा तालुक्यातील प्रशासनातील सर्वच विभागांचे कार्य कौतुकास्पद : पालकमंत्री अदिती तटकरे

kolad26

कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा पंचायत समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यात कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी सामाजिक संस्था यांसह प्रशासनातील विविध विभागांनी जास्तीतजास्त रक्तदान शिबिरे आयोजित करत राज्याला जाणवणारा हा रक्ताचा तुटवडा दुर करावा असे आवाहन केले आहे.

त्या आवाहनास प्रतिसाद देत रोहा पंचायत समिती मधील सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच रोहा तालुक्यातील महसूल,आरोग्य, पोलीस,यांच्यासह पंचायत समिती मधील सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.त्यामुळे तालुक्यातील प्रशासनातील सर्वच विभागांचे कोरोना काळात सुरु असलेले कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे.असे गौरोद्गार रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी रोहा पंचायत समितीच्या स्व. द. ग. तटकरे सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी काढले.

kolad27

.शुक्रवार २५ जुन रोजी घेण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी डॉ.यशवंतराव माने, तहसीलदार कविता जाधव, पोलीस निरिक्षक नामदेव बंडगर, उपसभापती रामचंद्र सकपाळ,जिल्हापरिषद सदस्य दयाराम पवार,प.स. सदस्या विणा चितळकर ,गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, पंडीत राठोड, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, विजयराव मोरे, रोहा तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, सुरेश मगर,नगरसेवक महेश कोलाटकर,महेंद्र दिवेकर, महेंद्र गुजर ,नंदकुमार म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना विषाणुच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी देशभरासह राज्यात दीड वर्षापासून विविध निर्बंधाद्वारे लॉकडाउन बजावण्यात आले. त्यामुळे सर्व प्रकारच्या आजारांतील रुग्ण व अपघातग्रस्तांच्या साठी लागणाऱ्या रक्ताच्या साठ्यात तुटवडा जाणवू लागला. त्यामुळं नागरिकांनी तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य बजवावे असे पालकमंत्री अदिति तटकरे म्हणाल्या, रक्तदाब शिबिरास.रोहा पंचायत समितीचे प्रशासकीन अधिकारी संजय कवितके ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय ससाणे, कृषी विस्तार अधिकारी अशोक महामुनी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी महारुद्र फडतरे, शिक्षण विस्तार अधिकारी साधुराम बांगारे, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता प्रशांत म्हात्रे, पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ. सचिन भोसले,बांधकाम उपविभाग अभियंता भुजवंत शिंदे, एकात्मिक बालविकास विभागाच्या शरयू शिंदे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.