Radhe maa : सलमान खानच्या BIG BOSS मध्ये दिसणार ‘राधे मां’

मुंबई : बिग बॉस हिंदीचा चौदावा सीझन 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. लोकांना या शोची खुपच उत्सुकता आहे. यातील स्पधर्कांची यादी तयार झाली असून नावे पुढे येऊ लागली आहेत. कलर्स चॅनल या स्पर्धकांची ओळख सोशल मीडियावर शेयर करत आहे.

सोशल मीडियावर यासंदर्भातील राधे मां चा एक व्हिडिाओ मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे. राधे मां चे नाव सुखविंदर कौर असून ती पंजाबची आहे. राधे मां ने कमी वयात अध्यात्माचा मार्ग निवडला होता.

कोरोनामुळे यावेळचा शो खुप वेगळा असणार आहे. तसेच स्पर्धकांसाठी काही अटी असणार आहेत. या शोमध्ये रूबीना दिलैक, अभिनव शुक्ला, शारदुल पंडित, शहजाद देओल, जस्मिन भसीन, निशांत मलकानी, पवित्रा पुनिया, ऐजाज खान, सारा गुरपाल, निक्की ताम्बोली, जान कुमार सानू आणि प्रतीक शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसतील.

शोमध्ये यावेळी मॉल, रेस्टॉरंट, स्पा आणि थिएटर या सुविधा आहेत. शोच्या प्रीमियरची शूटिंगही पूर्ण झाल्याचे समजते. सलमान खानच नेहमीप्रमाणे या शोचा होस्ट म्हणून दिसेल.